Posted in

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2024 Mahadbt farmar 2024 Yojana Bhausaheb Fondkar


WhatsApp Group

Join Now

Telegram Group

Join Now

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना-2024 Bhausabeb Fundkar Fhalbag Yojana

       राज्य सरकारने महा डी.बी.टी अंतर्गत सुरु करण्यात आलेले योजना या योजने साठी कसा अर्ज करायचा कोण या योजने साठी पात्र राहणार आहे या विषयी जाणून घेऊ सविसार 1) सन २०१८-१९ पासून राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना नव्याने सुरु करण्यात आली आहे. या योजनेमध्ये केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत जे लाभार्थी फळबाग लागवड बाबीचा लाभ घेऊ शकत नाही, त्यांना लाभ देण्यात येणार आहे. सदर योजना शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविली जात आहे.

2)योजनेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना मंजूर अनुदान पहिल्या वर्षी ५०%, दुसऱ्या वर्षी ३०% आणि तिसऱ्या वर्षी २०% अश्या तीन वर्षात देण्यात येणार असून लाभार्थी शेतकऱ्याने दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लागवड केलेल्या झाडांचे जीविताचे प्रमाण बागायती झाडांसाठी ९०% तर कोरडवाहू झाडांसाठी ८०% ठेवणे आवश्यक आहे. हे प्रमाण कमी झाल्यास शेतकऱ्याने स्वखर्चाने झाडे आणून पुन्हा जिवंत झाडांचे प्रमाण विहित केल्याप्रमाणे राखणे आवश्यक आहे.

3) या योजनेत भाग घेण्यासाठी शेतकरी कोंकण विभागात कमीत कमी १० गुंठे तर जास्तीच जास्त १० हे. आणि इतर विभागात कमीत कमी २० गुंठे तर जास्तीच जास्त ६ हे. क्षेत्र मर्यादेत लाभ घेऊ शकतो.

4) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत पात्र लाभार्थांना प्रथम त्या योजनेतील निकषाप्रमाणे लाभ घेणे आवश्यक आहे, उर्वरित क्षेत्रासाठी (वरील क्षेत्र मर्यादेच्या अधीन राहून) लाभार्थी या योजनेतून लाभ घेऊ शकतात.

5) अल्प, अत्यल्प भूधारक, महिला आणि दिव्यांग शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य आहे.


भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अनुदान किती आहे? Bhausaheb fundkar yojana Aanudan 

       या योजनेअंतर्गत लाभार्थ्याना ठिबक सिंचन संचाच्या उभारणीकरीता 100 टक्के अनुदान देण्यात येईल.

उपलब्ध फायद्यांसाठी कृपया दस्तऐवज पहा.

फळबाग अंतर अंडी हेक्टर प्रती अनुदान या विषयी सविस्तर माहिती 

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आवश्यक कागदपत्रे Bhausabeb fundkar yojana Document 

  •  ७/१२ व 8-अ उतारा
  •  हमीपत्र
  •  संयुक्त खातेदार असल्यास सर्व खातेदारांचे संमतीपत्र
  •  जातीचे प्रमाणपत्र (अनु.जाती/अनु.जमातीशेतकऱ्यांसाठी)

अर्ज कोठे करावा भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना 

अर्ज करण्यासाठी मित्रहो तुम्हाला mahadbtfarmar या वेब साईट वर जाऊन सर्व प्रथम आपले रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्यायचे आहे, नंतर तुम्ही अर्ज ऑनलाईन करू शकता.

अर्ज कसा करावा? How to apply Bhausaheb Fundkar yojana form Online 2024 



महत्वाच्या नोंद हे पण पहा 

अशाच नवीन शासन योजना आणि नौकरी संदर्भ साठी Whatsapp ग्रुप मध्ये फ्री मध्ये जॉईन व्हा.


WhatsApp Group

Join Now

Telegram Group

Join Now

Share Any More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *