डॉ.बाबासाहेब कृषी स्वावलंबन योजना.नवीन विहीरबांधकाम,जुनी वहीर दुरुस्ती 2024-dr.babasaheb krushi swalamban yojana
महाराष्ट्र राज्य सरकारने सुरु केलेली- डॉ.बाबासाहेब कृषी स्वावलंबन योजना.नवीन विहीर 2024
Dr.Babasaheb krushi swavlamban yojana. navin vihir.2024
सर्व शेतकरी मित्रांना खूप आनंदाची गोष्ट आहे महाराष्ट्र राज्य सरकाचा खूप महत्वाचा निर्णय हा शेतकरी यांच्या हितासाठी हि योजना महत्व पुर्ण ठरणार आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्याला नवीन विहीर बांधकाम तसेच जुनी विहीर दुरुस्ती इनवेल दुरुस्ती,वीज जोडणी आकार,शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरीकरण,सुक्ष्म सिंचन संच,पीव्हीसी पाईप,परसबाग या बाबीवर हि योजना पूर्ण अनुदान अनुज्ञेय आहे. त्यामुळे पात्र शेतकर्यांनी अर्ज ऑनलाईन स्वरूपाने करायचा आहे
या योजनेचा उद्देश
जमिनीचा ओलावा टिकून ठेवण्यासाठी व दुर्ष्टीकोनातून तसेच सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्द करून देऊन शेतकर्याचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी
डॉ.बाबासाहेब कृषी स्वावलंबन योजना.
हि योजना राज्य सरकारने चालू केली आहे तर यामध्ये अनुसूचित जाती SC /अनुसूचित जमाती / नव बोद्ध शेतकऱ्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागा मार्फत राबविण्यात येत आहे.
कसे दिले जाणार आहे योजनेला अनुदान
या योजनेंतर्गत नवीन विहीर (रु.2.50 लाख), जुनी विहीर दुरुस्ती (रु.50 हजार), इनवेल बोअरींग (रु.20 हजार), पंप संच (रु.20 हजार), वीज जोडणी आकार (रु.10 हजार), शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरीकरण (रु.1 लाख) व सुक्ष्म सिंचन संच (ठिबक सिंचन संच-रु.50 हजार किंवा तुषार सिंचन संच-रु.25 हजार), पीव्हीसी पाईप (रु.30 हजार) परसबाग (रु.500/), या बाबींवर अनुदान अनुज्ञेय आहे. सदर योजना मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा,सांगली व कोल्हापूर हे जिल्हे वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे.
काय आहे पात्रता
लाभार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.
लाभार्थीने जातीचा वैध दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
जमिनीच्या 7/12 व 8-अ चा उतारा सादर करणे बंधनकारक आहे.
लाभार्थींची वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये दीड लाखाच्या मर्यादेत असावी.
उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
लाभार्थीची जमिनधारणा 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत (नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर) असणे बंधनकारक आहे.
1) सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र.
2) तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (र. रु. 1,50,000/- पर्यंत).
3) जमीन धारणेचा अदयावत 7/12 दाखला व 8अ उतारा.
4) ग्रामसभेचा ठराव.
5) तलाठी यांचेकडील दाखला – एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (0.20 ते 6 हेक्टर मर्यादेत); विहीर असल्याबाबत प्रमाणपत्र; प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.
6) लाभार्थीचे बंधपत्र (100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर).
7) कृषि अधिकारी (विघयो) यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र
8) गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र
9) ज्या विहीरीवर जुनी विहीर दुरुस्ती/ इनवेल बोअरिंगचे काम घ्यावयाचे आहे त्याविहिरीचा कामा सुरू होण्यापूर्वीचा फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थी सह)
10) इनवेल बोअरींगसाठी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील feasibility report.
11) अपंग असल्यास प्रमाणपत्र
अशा प्रकारे कागदपत्रे राहणार आहेत. हे कागदपत्रे असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र राहणार आहेत.
जुनी विहीर दुरुस्तीसाठी किंवा इनवेल बोरिंग साठी लागणारे कागदपत्र
1) सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र.
2) तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (र. रु. 1,50,000/- पर्यंत).
3) जमीन धारणेचा अदयावत 7/12 दाखला व 8अ उतारा.
4) ग्रामसभेचा ठराव.
5) तलाठी यांचेकडील दाखला – एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (0.20 ते 6 हेक्टर मर्यादेत); विहीर असल्याबाबत प्रमाणपत्र; प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.
6) लाभार्थीचे बंधपत्र (100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर).
7) कृषि अधिकारी (विघयो) यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र
8) गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र
9) ज्या विहीरीवर जुनी विहीर दुरुस्ती/ इनवेल बोअरिंगचे काम घ्यावयाचे आहे त्याविहिरीचा कामा सुरू होण्यापूर्वीचा फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थी सह)
10) इनवेल बोअरींगसाठी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील feasibility report.
11) अपंग असल्यास प्रमाणपत्र f
अशा प्रकारे जुनी विहीर दुरुस्ती साठी लागणारे कागदपत्रे.
शेततळे अस्तरीकरण / वीज जोडणी .पंप संच /सुश्म चिंचनसंच या साठी लागणारे कागदपत्रे
1) सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र.
2) तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र. (र. रु. 1,50,000/- पर्यंत ).
4) जमीन धारणेचा अदयावत 7/12 दाखला व 8अ उतारा.
5) तलाठी यांचेकडील एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला. (0.20 ते 6 हेक्टर मर्यादेत)
6) ग्रामसभेची शिफारस/मंजूरी
7) शेततळे अस्तरीकरण पुर्णत्वाबाबतचे हमीपत्र (100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर)
8) काम सुरू करण्यापूर्वीचा फोटो (महत्वाची खुणेसह)
9) विद्युत कनेक्शन व विद्युत पंपसंच नसलेबाबत हमीपत्र
10) प्रस्तावित शेततळ्याचे मापन पुस्तिकेच्या छायांकीत प्रत व मापन पुस्तकातील मोजमापाप्रमाणे संबंधित मंडळ कृषि अधिकारी यांचेकडून अंदाजपत्रक प्रति स्वाक्षरी करुन घ्यावे.आहे
व अर्ज आँनलाईन करावा
अर्ज कसा व कोठे आँनलाईन करावा .
अर्ज करण्यासठी .www.mahadbtfarmar.gov.in या संकेतेथळ वर जरून अर्ज ऑनलाईन स्वरूपाने करायचा आहे.
या याजेनेसाठी किती आहे अनुदान २०२४