Posted in

लेक लाडकी योजना मुलींना शासन देणार आता 1 लाख 1 हजार रुपये! कश्या प्रकारे-lek ladaki yojana all informition in datails

Table of Contents

लेक लाडकी योजना -शासन देणार मुलींना १ लाख रुपये Lek Ladki yojana 2024 New Update Government Scheme 2024 

Lek Ladki Yojana full Information काय आहे लेक लाडकी योजना कोणत्या मुलींना मिळणार या योजनेचा लाभ 

महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली लेक लाडकी योजना ही मुलींसाठी एक महत्वपूर्ण योजना असून या अंतर्गत गरीब व आर्थिक दृष्ट्या मागास कुटुंबातील मुलींना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक लाख एक हजार रुपयांचे आर्थिक मदत दिली जाणार आहे. लेक लाडकी योजना ही महाराष्ट्रातील सर्व गरीब मुलींसाठी खूप फायद्याची व वरदानदायी ठरणार आहे. राज्याच्या अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023-24 चा अर्थसंकल्पामध्ये ही योजना जाहीर केली होती. या योजनेच्या अंतर्गत गरीब पात्र मुलींना वयाची 18 वर्षे पूर्ण करेल तेव्हा तिला 75 हजार रुपयांची रोख रक्कम दिली जाणार आहे

लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • याकरिता लाभार्थी मुलीचा जन्माचा दाखला, कुटुंबप्रमुखाचा एक लाख रुपये किंवा कमी उत्पन्न असल्याचा तहसीलदार यांचा दाखला
  • लाभार्थी मुलीच्या पालकांचे आधार कार्ड, बँकेच्या पासबुकची पहिल्या पानाची छायांकित प्रत, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड छायांकित प्रत
  • मतदान ओळखपत्र( मुलगी जेव्हा शेवटचा लाभाकरिता म्हणजेच अठरा वर्षे पूर्ण होईल तेव्हा तिचे मतदार यादीत नाव आवश्यक)
  • तसेच या टप्प्यावर मुलगी शिक्षण घेत असल्याचा संबंधित शाळेचा दाखला
  • तसेच या टप्प्यावर मुलगी शिक्षण घेत असल्याचा संबंधित शाळेचा दाखला
  • कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र

या योजनेच्या लाभ घेण्यासाठी महत्त्वाच्या अटी

ही योजना प्रामुख्याने एक एप्रिल 2023 रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या पिवळे व केशरी राशन कार्ड अह्णाऱ्या  कुटुंबामध्ये दोन मुलींना लागू राहणार असून यामध्ये एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहिला. पहिल्या हपत्त्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता किंवा पित्याने कुटुंबनियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहणार असून सदर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1. लाखापेक्षा जास्त नसावे.

शासन मुलींना देणार एक लाख एक हजार रुपये

योजनेचे अर्ज ग्रामीण व नागरी बालविकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, विभागीय उपायुक्त महिला व बालविकास यांच्या कार्यालयात उपलब्ध असतील.

अंगणवाडी पर्यवेक्षिका, मुख्यसेविकांकडून त्या अर्जाची व प्रमाणपत्रांची छाननी तथा तपासणी होईल. 

सा होणार लाडकी बहिण योजना चा  पैसे वाटप टप्पा 

  • लेक लाडकी योजनेत मुलगी जन्मानंतर ५ हजार
  • इयत्ता पहिलीत ४ हजार
  • इयत्ता सहावीत ६ हजार
  •  इयत्ता ११ वीत  ८ हजार 
  • १८ वय वर्ष पूर्ण झाल्यावर ७५ हर्जार देण्यात येणार आहे

महत्वाच्या नोंद हे पण पहा 

अशाच नवीन शासन योजना आणि नौकरी संदर्भ साठी Whatsapp ग्रुप मध्ये फ्री मध्ये जॉईन व्हा.
Share Any More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *