Posted in

मुख्यमंत्री योजना दूत भारती २०२४ रिक्त जागा ५० हजार

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी बहुउद्देशीय  योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन २०२४

योजना दूत म्हणजे काय ?



WhatsApp Group


Join Now

Telegram Group


Join Now

नमस्कार मित्रहो आज तुमच्या साठी महत्वाची न्यू अपडेट घेऊन आलो आहे यामध्ये तुम्हीला सरकारी नोकरी च्या तुम्ही शोधात असेल तर तुमच्याच गावात एक योजना दूत म्हणून रिक्त जागा राहणार आहे त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता अर्ज कसा करायचा या विषयी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. जर तुम्ही शहरी भागात राहत असेल तर तुम्हाला दर ५ हजार लोकसंख्या मध्ये एक जागा,योजना दूत राहणार आहे,आणि ग्रामीण भागासाठी यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये एक योजना दूत अशी जागा राहणार आहे,.अशा प्रकारे ५० हजार एकूण जागा मुख्यमंत्री प्रशिक्षण योजना दूत अंतर्गत योजना दूत म्हणून जागा भरल्या जाणार आहेत,

योजना दूत म्हणजे काय ?

मित्रहो शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी  मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

महत्वाच्या नोंद हे पण पहा

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील.

योजना दूत पगार/मानधन 

 मुख्यमंत्री युवा कार्य शिकाऊ  प्रशिक्षानार्थी ( बहुउद्देशीय ग्रामपंचायत कर्मचारी योजना दूत यांना  किती किती पगार/मानधन राहणार आहे.

योजना दूत ला १०००० हजार प्रती महिना मिटणार आहे.

मुख्यमंत्री योजनादूत उद्देशः

  • योजनादूत म्हणून 50,000 तरुणांना इंटर्नशिपची संधी
  • सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी तरुणांचा सहभाग
  • कल्याणकारी योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचणार

मुख्यमंत्री योजनादूत पात्रता


  • वयोमर्यादा १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार.
  • शैक्षणिक अर्हता- कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर.
  • उमेदवाराला संगणक ज्ञान आवश्यक.
  • उमेदवाराकडे अदययावत मोबाईल असणे आवश्यक.
  • उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक.

मुख्यमंत्री योजनादूत कागदपत्रे 

उमेदवारांचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे.या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.


अर्ज कसा ऑनलाईन करायचा 

मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.

महत्वाच्या नोंद हे पण पहा 

अशाच नवीन शासन योजना आणि नौकरी संदर्भ साठी Whatsapp ग्रुप मध्ये फ्री मध्ये जॉईन व्हा.


WhatsApp Group


Join Now

Telegram Group


Join Now
Share Any More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *