मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बँकेतून पैसे कट करू नये या संदर्भात सर्व बँकांना आदेश सर्वांनी शासन निर्णय
शासन निर्णय जपून ठेवावा पैसे कपात झाले तर बँकेकडे मागणी करा
१) समन्वयक, राज्य स्तरीय बैंकर्स समिती, बैंक ऑफ महाराष्ट्र, लोकमंगल, शिवाजीनगर, पुणे-५
२) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (सर्व) (मुंबई वगळून)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेच्या अंमलबजावणीबाबत..
“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून माहे जुलै, २०२४ व माहे ऑगस्ट, २०२४ या दोन्ही महिनांच्या एकत्रित रु.३०००/- इतका आर्थिक लाभ अंतिम पात्र लाभार्थी महिलांना त्यांचा आधार संलग्न (Aadhar Seeded) बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण पध्दतीने (DBT) अदा करण्यात आला आहे. तथापि, सदर योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना प्राप्त झालेला आर्थिक लाभ आहरित करता येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. तरी “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेंतर्गत आर्थिक लाभ अंतिम पात्र लाभार्थी महिलांना प्राप्त होण्याच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत:-
१) “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेतून हस्तांतरित केलेले आर्थिक लाभ (रक्कम)
कोणत्याही थकित कर्जाच्या बदल्यात समायोजित केले जाऊ नये, ही रक्कम विशिष्ट
उद्देशासाठी असून ती इतर कर्ज समायोजनासाठी वापरता येणार नाही. २) सदर रक्कम त्याच्या खात्यात वर्ग केल्यानंतर लाभार्थी महिलांना कोणत्याही थकबाकीच्या समायोजनामुळे रक्कम काढण्यास नकार देण्यात येऊ नये.
महत्वाच्या नोंद हे पण पहा
३) काही लाभार्थ्याकडे बँकेचे प्रलंबित असलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे बँक खाते गोठविण्यात आले असल्यास सदर बैंक खाते तात्काळ सुरु करण्यात यावे व या योजनेतंर्गत लाभार्थ्यांना प्राप्त होणारी लाभाची रक्कम लाभार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात यावी.
उपरोक्त सूचनेच्या अनुषंगाने आपण आपल्यास्तरावरुन संबंधितांना आवश्यक त्या सूचना देण्यात यावी ...
महत्वाच्या नोंद हे पण पहा
- Pm Vishavkarma Yojana 2024 वाढीव बजट 13000 कोटी रुपये – आत्ता अल्प कला कारागीर यांना मिळणार २ लाखांपर्यंत कर्ज
- लाडकी बहिण योजना नवीन पोर्टल वर अर्ज ऑनलाईन कसा करायचा सविस्तर न्यू उपडेट २०२४
- महा डी बी.टी अंतर्गत शेतकऱ्यासाठी मोफत बॅटरी फवारा 2024
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना-2024 Bhausabeb Fundkar Fhalbag Yojana
अशाच नवीन शासन योजना आणि नौकरी संदर्भ साठी Whatsapp ग्रुप मध्ये फ्री मध्ये जॉईन व्हा.