शेतकरी ओळखपत्र नसेल तर पीएम किसानचे पैसे विसरा,,,सविस्तर माहिती,
॥ राज्य सरकारचा नवा नियम ठरला त्रासदायक शेतकरी ओळख पत्र
पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांसाठी ओळख क्रमांक आता अनिवार्य करण्यात आले आहे. वीसाव्या हप्त्यापासुन नवीन नियम लागू करण्यात आले असुन ज्यामध्ये शेतकऱ्यांना कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार लिंक करावे लागणार आहेत. खरं तर, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत, महाराष्ट्र सरकारच्या अँग्रीस्टॅक योजने अंतर्गत शेतकऱ्यांना आधार लिंक करण्याची आणि शेतकरी नोंदणीसाठी मनस्ताप ओळख क्रमांक मिळवण्याची प्रक्रिया सुरू केली जात आहे.
पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता २४ फेब्रुवारी ला शेतकरी यांच्या अकाऊंट ला ट्रान्स्फर केला जाणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी यांनी लवकर पी.एम.किसान ओळख क्रमांक साठी अर्ज करणे गरजेजे आहे..१९ व हफ्ता जरी वितरित केला गेला या हप्त्यासाठी शेतकरी ओळख क्रमांकाची अट लागू नसल्याने हा हप्ताशेतकऱ्यांना बिनदिक्कतपने मिळाला आहे. मात्र आता २० व्या हप्त्यापासून शेतकरी ओळखपत्र या योजनेचा लाभघेण्यासाठी बंधनकारक होणार आहे. तथापि, नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी, पती-पत्नी आणि १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या कुटुंबातील सदस्यांची 2 आधार नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. निवमांचे पालन केले नाही तर पीएम किसानचे पैसे मिळवण्यास शेतकरी पात्र ठरणार नाहीत असे हे आदेश आहेत.
पी.एम किसान ओळख पत्र/आयडी कसे ऑनलाईन करावे ..How to Online Pm kisan Farmer Identy Card
● शासनाच्या आदेशामुळे मागील काही दिवसापासून शेतकरी फार्मर आयडी तयार करण्यासाठी सीएससी केंद्रावर धाव घेतंना दिसून येत आहेत. दुर्गम, ग्रामीण भागात सुविधा उपलब्ध नसल्याने शेतकरी तालुका मुख्यालय गाढून ओळखपत्र तयार करीत आहेत. यात त्यांना शारीरिक, मानसिक तसेच आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. – अर्ज करण्यासाठी तुम्हाला जवळच्या csc केद्र चालक यांच्या कडे जाऊन अर्ज ऑनला ईन करता येतो.
केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी अँग्रीस्टक योजनेअंतर्गत राज्य शासनाने नुकताच सर्व शेतकऱ्यांना युनिक फार्मर आयडी तयार करण्याचे आदेश दिले आहे.
याअंतर्गत शेतकऱ्यांसाठी नोंदणी क्रमांक आणि पूर्वीचा ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. ज्यामध्ये शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार लिंक करावे लागणार आहे.
पी.एम किसान ओळख पत्र आयडी लाभ/ फायदा शेतकरी यांना होणार आहे.
- mahadibt योजना चा लाभ घेण्यासाठी याचा लाभ होणार..
- farmer id असेल तरच pm kisan योजने चा लाभ मिळणार आहे.
- एकाच पर्याय मध्ये सर्व सरकारी योजनाचा लाभ मिळणार आहे.
- डिजिटल पद्धतीने पिक व पिकाचे मार्यादिनुसार KCC कर्ज मिळणार आहे.
- शेतातील माती मृदा आरोग्य बद्दल योग्य माहिती समजून घेता येणार आहे.
- पिकावरील रोगाच्या प्रादुर्भावाचा अंदाज समजून घेता येणार आहे.
- शेतकर्यांना डिजिटल पिक कर्ज विमा हमीभाव खरेदी साठी मदत होणार.