Posted in

Gopinath Munde Vima Yojana शेतकरी अपघात विमा अनुदान योजना 2025

Gopinath Munde Vima Yojana शेतकरी यांच्या हितासाठी राबविण्यात येणारी एक महत्वपूर्ण योजना म्हणजे गोपनाथ मुंढे शेतकरी विमा योजना या योजनेचे संपूर्ण माहिती सविस्तरपणे दिली आहे.

मित्रहो राज्यात शेती व्यवसाय करत असतांना होणारे अपघात रस्ता आणि रेल्वे पाण्यात बुडून मृत्यू जंतुनाशक औषधे तसेच उंचावरून पडून अपघात,वीज पडून- इतर विषबाधा,सर्प दंश जनावराच्या हल्याने/चावल्याने झालेला मृत्यू.अपघात याने झालेला मृत्यू/अथवा अपंगगत्व आल्यास गोपनाथ मुंढे शेतकरी विमा योजना राबविण्यात येत आहे.

Gopinath vima yojana
गोपीनाथ मुंडे विमा योजना 2025 अंतर्गत शेतकऱ्यांना अपघात विम्याचे आर्थिक संरक्षण

Gopinath Munde Vima Yojana या योजनेसाठी साठी पात्रता

कृषी गणनेनुसार निर्धारित केलेले शेती वाहितीदार खातेदार असणारे शेतकरी राहिणार आहेत.शेतकऱ्याच्या कुटुंबातील एक सदस्य (आई -वडील शेतकरी यांची पती किंवा पत्नी.मुलगा तसेच अविवाहित मुलगी यापैकि कोणतीही कुटुंबातील एक व्यक्ती या योजनेस पात्र राहणार आहे वय मर्यादा 10 ते 75 वय वर्ष गट यांचा समावेश राहणार आहे

गोपनाथ मुंढे शेतकरी विमा योजना वारस या विषयी

  • उपघातग्रस्त शेतकरी /यांचा /यांची पती/पत्नी
  • उपघातग्रस्त शेतकरी /यांचा /यांची मुलगी/मुलगी
  • उपघातग्रस्त शेतकरी यांची आई किंवा वडील
  • नातेवाई यांचा समावेश आहे जे वारसादार कायदेशीर असतील.

गोपनाथ मुंढे शेतकरी विमा योजना pdf

गोपनाथ मुंढे शेतकरी विमा योजना अपघाती बाबी या समावेश असेलेले अपघात

१) रेल्वे अपघात २) पाण्यात बुडून मृत्यू ३) जंतू नाशक औषधे हाताळतांना किंवा अन्य कारणामुळे विषबाधा ४) वीज पडून झालेला अपघात ५) खून ६) उंचावरून पडून झालेला अपघत ७) सर्प दंश व विंचू चावल्याने झालेला अपघात ८) जनावराच्या हल्ल्याने किंवा चावल्याने यामध्ये जर जखमी झाले असेल तर ९) नक्षलवादी दंगल/दंगल १०) बाळंतपानात झालेला मृत्यू इतर अपघात यामध्ये समावेश आहेत.

गोपनाथ मुंढे शेतकरी विमा योजना अपघाती यामध्ये समावेश नसलेले अपघात

नैशार्गिक मृत्यू २) विमा कालावधी पृवाचे अपंगत्व ३) आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करून घेणे जीव देण्याचा पर्यन्त करणे ४)आमली पदार्थ यांचे शेवन करून झालेला अपघात ५)शरीरातील रक्तस्राव ६) शर्यत/मोटार शर्यत यामध्ये झालेला अपघात ७) युद्ध ८) सैनातील नोकरी ९) जवळच्या लाभ धारकाकडून झालेला खून १०) गुन्हाच्या उदेशाने कायद्याचे उल्लंघन करतांना जाहेला अपघात ११) भ्रामिस्तपणा

Gopinath Munde Vima Yojana मिळणारे अनुदान व रक्कम

गोपनाथ मुंढे शेतकरी विमा अपघाताचे स्वरूप अनुदान व रक्कम
अपघाती मृत्यू 2.00.000 ( दोन लक्ष रुपये )
अपघातामुळे दोन डोळे किंवा अवयव निकामी होणे 2.00.000 ( दोन लक्ष रुपये )
अपघातामुळे एक डोळा व दोन अवयव निकामी होणे 2.00.000 ( दोन लक्ष रुपये )
अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी होणे 1.00.000 ( एक लक्ष रुपये )

गोपनाथ मुंढे शेतकरी विमा योजना लागणारे कागदपत्रे

  • 7/12 उतारा
  • मृत्यू चा दाखला
  • शेतकऱ्याचे वारस म्हणून गावकामगार तलाठी यांच्या कडील गाव नमुना नं.६ नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद
  • शेकार्याच्या वयाच्या पडतळणी करिता वयाचा दाखला यामध्ये( शाळा सोडल्याचा दाखला/tc आधार कार्ड निवडणूक प्रमाणपत्र ज्या कागदपत्र द्वारे ओळख पडली जाईल वयाची खात्री होतील असे कागदपत्र
  • प्रथम माहिती अहवाल /स्थळ पाहिनी पंचनामा /पोलीस पाठील माहिती अहवाल

अपघात व अपघात समंधीत लागणारे कागदपत्रे

शेतकरी अपघात विमा अनुदान योजना अपघाताचे स्वरूप लागणारे कागदपत्रे
रस्ता/रेल्वे अपघातइन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोटेंम अहवाल, विमा संरक्षित व्यक्ती वाहन चालविताना अपघात झाल्यास त्याचा मोटार वाहन परवाना.
पाण्यामध्ये बुडून मृत्यूइन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोटेंम अहवाल, बुडून बेपत्ता झाल्यास फक्त प्रथम माहिती अहवाल व क्षतिपूर्ती बंधपत्र आवश्यक.
जंतुनाशक अथवा अन्य कारणामुळे विषवाधाइन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टम अहवाल, रासायनिक विश्लेषण अहवाल (व्हिसेरा अहवाल).
विजेचा घक्का अपघात इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टम अहवाल, रासायनिक विश्लेषण अहवाल (व्हिसेरा अहवाल).
वीज पडून मृत्यू
इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टम अहवाल,
खून इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टम अहवाल, रासायनिक विश्लेषण अहवाल (व्हिसेरा अहवाल).दोषारोष पत्र
उंचावरून पडून झालेला अपघात इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टम अहवाल, पोलीस अंतिम अहवाल
सर्प दंश किंवा विंचू दंश इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टम अहवाल, उपचारा पूर्वी निधन झाल्यास पोस्ट मोर्टम झाले नसल्यास या अहवालातून सूट मात्र वैदिकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र शासकीय अधिकारी यांची साक्षरी असणे अनिवार्य .
हत्या /नक्षलवादी इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टम अहवाल,नक्षलवादी हत्येसंधार्भात कार्यालयीन कागदपत्रे.
जनावरांच्या हल्ल्यामुळे / चावण्यामुळे जखमी / मृत्यू
अ) जनावरांच्या चावण्यामुळे होऊन शव न मिळणे रेबीज होऊन मृत्यू
ब) जखमी होऊन मृत्यू
क) जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू
इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोटेंम अहवाल, दंगली बाबतची कार्यालयीन कागदपत्रे.
दंगलइन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोटेंम अहवाल, दंगली बाबतची कार्यालयीन कागदपत्रे.
बाळंतपणातील मृत्यूबाळंतपणात मृत्यू झाला असल्याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र शासकीय आरोग्य केंद्र अधिकाऱ्याकडून प्रतिस्वाक्षरित केलेले
अन्य कोणतेही अपपातइन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोटेंम अहवाल, पोलिस अंतिम अहवाल,
अपंगत्वाच्या लाभाच्या पुराव्यासाठी सादर करावयाची कागदपत्रेअपंगत्व अथवा अवयव निकामी होण्याचे कारणाबाबतचे डॉक्टरांचे अंतिम प्रमाणपत्र अथवा दवाखान्याच्या नोंदी. २) प्राथमिक आरोग्य केंद्र/उपकेंद्र/जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतिस्वाक्षरीसह कायम अपंगत्वाचे प्रमाणपत्र.

गोपनाथ मुंढे शेतकरी विमा प्रस्ताव सादर / मंजूर करण्याबाबत पद्धत

जेव्हा शेतकऱ्यांचे अपघाताचे प्रकरण निदर्शनास येईल तेव्हा संबंधित अपघातग्रस्त शेतकरी / शेतकऱ्यांचे वारसदार यांनी सर्व निर्धारीत कागदपत्रांसह परिपूर्ण विमा प्रस्ताव संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे ३० दिवसांच्या आत सादर करावा.

अपघातग्रस्त शेतकऱ्याबाबत प्राथमिक माहिती प्राप्त झाल्यावर सखोल चौकशी करण्यासाठी संबंधित महसूल अधिकारी, पोलिस अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या पथकाने प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी

करून त्याबाबतचा अहवाल तहसीलदार यांना घटना घडल्यापासून ८ दिवसांच्या आत सादर करावा,तालुका कृषी अधिकारी यांनी प्राप्त झालेल्या विमा प्रस्तावांची छाननी करून पात्र असलेले विमा प्रस्ताव संबंधित तहसीलदार यांचेकडे सादर करावा.

तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठकीमध्ये ३० दिवसांच्या आत संबंधित शेतकरी /शेतकरी कुटुंबाच्या वारसदारांना मदत देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. यानंतर संबंधित तालुका कृषी अधिकारी पांच्या मार्फत अपघातग्रस्त शेतकरी / वारसदारांच्या बँक खात्यात ईसीएसद्वारे निधी अदा करण्यात येईल.

महत्त्वाचे नोंद :-

fruit crop insurance-फळबाग विमा 2025 सुरु झाला आजच अर्ज करा

Share Any More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *