Solar Pump Yojana 2025 अंतर्गत 5HP सौर कृषी पंप
Solar Pump Yojana 2025 अंतर्गत 5HP सौर कृषी पंप
Posted in

Solar pump yojana 2025:शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप अर्ज सुरु

Solar pump yojana 2025: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 -सौर कृषी पंप याचा वापर करून शेतकऱ्यांच्या सिंचन समस्यावर पर्याय/सुलभ होण्यासाठी Magel Tyala solar yojana पुन्हा एकदा सुरु करण्यात आली आहे.या योजनेतून शेतकऱ्यांना 3 HP 5 HP 7.5 HP सोलर/सौर पंप 90 % अनुदानावर देण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारने पुन्हा एकदा मागेल त्याला सोलार पंप योजना सुरु केली आहे.या योजनेसाठी 9 लाख सौर पंप मजुरी देण्यात आली आहे.मागेल त्याला सौर पंप योजना काय आहे.या योजनेसाठी लागणारी पात्रता.अर्ज प्रकिया याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Solar pump yojana 2025:मागेल त्याला सौर पंप योजना काय आहे?

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 या योजनेत शेतकरी यांना शेती व्यवसाय सिंचनासाठी सोलर पंप दिला जातो.शेतकऱ्यांना 3 HP 5 HP 7.5 HP सोलर/सौर पंप 90 % अनुसूचित जाती जमाती साठी 5% रक्कम भरावी लागते व सर्व सामान्य शेतकरी यांना जवळपास 10% रक्कम भरावी लागते बाकी रक्कम हि राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या मार्फत 90 % अनुदान मिळते.

मागेल त्याला सौर पंप योजनेचा उद्देश!

  • सिंचनासाठी शाश्वत पद्धत पर्याय उपलब्ध करून देणे.
  • शेतकरी यांना सिंचनासाठी विजेची अडचण लक्ष्यात घेऊन वीज बजत व सिंचन सुलभं करणे.
  • अनुदानाच्या माध्यमातून शेतकरी यांना आर्थिक मदत करणे.

Solar pump yojana 2025:मागेल त्याला सौर पंप योजना पात्रता.

  • महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे
  • शेतकरी यांच्याकडे शेत जमीन असणे अनिवार्य आहे
  • 1 एक्कर शेत असेल तर 3 HP,5 एक्कर असेल तर 5 HP सोलर पंप आणि
  • 5 एक्कर पेक्षा जास्त शेत जमीन असेल तर त्या शेतकऱ्यांना 7.5 HP सोलर पंप दिला जातो.

solar pump apply online/मागेल त्याला सौर पंप अर्ज प्रकिया

मागेल त्याला सौर पंप योजनाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी अर्ज कसा करावा अर्ज करण्यासाठी शेतकरी यांना महाराष्ट्र राज्य सरकार चे अधिकृत वेबसाईट https://www.mahadiscom.in/ ला भेट द्या.

  • या अधिकृत वेबसाईट वर गेल्या नंतर होम Page वर तुम्हाला लाभार्थी सुविधा असे पर्याय दिसेल यावर क्लिक करा.
  • नंतर -अर्ज करा -या पर्याय वरती क्लिक करा.या वर क्लिक केल्या नंतर तुमच्या समोर एक ऑनलाईन अर्ज दिसेल त्यावर सर्व/संपर्ण शेतकऱ्यांची व्यवस्थित माहिती भरून अर्ज सम्बिट करा.

सौर पंप 2025 अर्ज दिनांक– 05 जुलै 2025 ते 10 ऑगस्ट 2025

Solar pump yojana 2025:मागेल त्याला सौर पंप कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • शेती समन्धित पुरावा -7/12 उतारा
  • 7/12 उतारा यावर-विहीर किंवा बोअर व्हेल-तलाव.कालवा.शेततळे किंवा इतर काही पाण्याचा स्रोत यांची नोंद असणे अनिवार्य आहे.
  • बँक पासबुक
  • एक मोबाईल नंबर
  • अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती मधील शेतकरी असेल तर या शेतकरी यांना जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.

3 HP 5 HP 7.5 HP पंप आणि भरली जाणारी रक्कम

पंप भरली जाणारी रक्कम 10 %
3 HP 17.500 -18.000
5 HP22.500
7.5 HP27.500

सौर पंप नुकसान -वादळी पाऊस वारा नौसार्गिक आपत्ती-उलथून पडणे,व चोरी जाने- यामध्ये जर शेतकरी यांच्या सौर पंप चे नुकसान झाले तर तुम्ही निवड्ल्याली सोलर एजन्सी द्वारे सोलर पंप विमा दिला जातो.किंवा सोलर मध्ये काही खराबी झाली तर दुरुस्ती केली जाते दुरुस्ती कालावधी 5 वर्ष पर्यंत जिमेदारी हि सोलर एजन्सी ची असते.

मागेल त्याला कुशी पंप योजना शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्वाची योजना म्हणून ठरत आहे.त्यामुळे या योजना च्या माध्यमातून शेतकरी बांधवांना रात्री अपरात्री शेतात पानी देण्यास जाण्याची गरज नाही.आणि लाईट या वर आवलंबून न राहता शेतकर्यांच्या आर्थिक उत्पन्नात चांगल्या प्रकारे वाढ झालेली दिसून येत आहे.

Share Any More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *