Jalna Police Patil Bharti 2025 : जालना जिल्ह्यात राहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत जालना पोलिस पाटील भरती 2025 जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 724 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करावा.
Jalna Police Patil Bharti 2025 भरतीची संपूर्ण माहिती
भरतीचे नाव | जालना पोलिस पाटील भरती 2025 |
---|---|
पदाचे नाव | पोलिस पाटील |
एकूण रिक्त जागा | 714 |
अर्ज प्रक्रिया : | ऑनलाईन / ऑफलाईन (जाहिरातीप्रमाणे) |
अर्ज दिनांक | 12 सप्टेंबर 2025 ते 27 सप्टेंबर 2025 |
अधिक माहितीसाठी संकेतस्थळ | https://jalna.gov.in/ |
जालना जिल्हा पोलीस पाटील यांचे एकूण मंजूर पदे 923 आहेत.त्यापैकी कार्यरत 199 असून रिक्त पदे 724 अगेत सदर पदे रिक्त असल्यामुळे गाव पातळीवर कायदा आणि सुव्यवस्था अभाधित राहण्यासाठी कार्यकारी दंडाधिकारीव पोलीस अधिकारी यांना योग्य व आवश्यक अशी माहिती मिळत नसल्या कारणामुळे अडचण निर्माण होत आहे. ग्रामीण भागातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढू नये व गावातील नागरिकाचे सामाजिक स्वस्थ व शांतता राहावी,या दृष्टीकोनातून पोलीस पाटील रिक्त पदे तातडीने भरविण्यात येत आहेत.
शैक्षणिक पात्रता
- उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असावा.
- उमेदवार संबंधित तालुक्यातील स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
- किमान वय : 25 वर्षे
- कमाल वय : 45 वर्षे
- राखीव प्रवर्गासाठी शासकीय नियम लागू होतील.
निवड प्रक्रिया
- लेखी परीक्षा
- मुलाखत / स्थानिक पडताळणी
- अंतिम निवड यादी
पोलीस पाटील भरती प्रकिया आणि टप्पे / महत्वाच्या तारखा
जाहिर नोटीस प्रसिद्ध तारीख | 01 सप्टेंबर 2025 ते 04 सप्टेंबर 2025 |
आरक्षणावर आक्षेप मागविणे | 08 सप्टेंबर 2025 ते 10 सप्टेंबर 2025 |
जाहिरात प्रसिद्ध दिनांक | 12 सप्टेंबर 2025 |
अर्ज दिनांक | 12 सप्टेंबर 2025 ते 27 सप्टेंबर 2025 |
अर्ज छाननी दिनांक/प्रवेश पत्र वाटप | 28 सप्टेंबर 2025 ते 01 ऑक्टोबर 2025 |
लेखी परीक्षा दिनांक | 05 ऑक्टोबर 2025 |
लेखी परीक्षा निकाल प्रसिद्ध दिनांक | 07 ऑक्टोबर 2025 |
पात्र उमेदवार तोंडी परीक्षा /अंतिम उमेदवाराची यादी प्रसिद्ध करणे | 08 ऑक्टोबर 2025 ते 10 ऑक्टोबर 2025 |
पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र दिनांक 15 ऑक्टोबर 2025
जालना जिल्हा पोलीस पाटील जाहिरीत pdf स्वरुपात मूळ जाहिरात दिली आहे. ती डाऊनलोड करून सविस्तर माहिती वाचा.
तुमच्या देखील गावात पोलीस पाटील रिक्त जागा असेल तर पोलीस पाटील या पदासाठी पात्रता आणि निकषा च्या अधीन राहून आपण देखील अर्ज करू शकता.
हे पण वाचा.